वरणगावात संघटनेचा इशारा ; कर्मचारी हिताच्या निर्णयांना ‘खो’
वरणगाव- नगरपालिका प्रशासन कर्मचारी हिताचे कोणतेच सकारात्मक निर्णय घेत नसल्याने जळगाव जिल्हा नगरपालिका मजदूर संघ युनिट वरणगाव नगरपरीषद अध्यक्ष अंनत गडे व कर्मचारी संघटनेने उपोषणाचा इशारा दिला .आहे. उपोषणस्थळी विपरीत परीणाम घडल्यास त्याला नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असेही पत्रकात नमूद आहे.वरणगाव नगरपरीषेदेचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी हिताचे निर्णय घेण्यासाठी व कर्मचार्यांना सुविधा पूरविण्यात अपयशी ठरत असून जगाव जिल्हा नगरपालिका मजदूर संघ युनिट वरणगाव नगरपरीषदेच्या माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला असून 7 जून रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. वरणगाव नगरपरीषदेतील फक्त 14 कर्मचार्यांच्या समावेशनास मान्यता देण्यात आली आहे. कर्मचार्यांचे वय, शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, सेवाज्येष्ठता आणि कामावर लागतांनाचे पद व आज रोजीचे पद या सर्व बाबी तपासून कर्मचारी समावेशासाठी विचार करावा, एकही कर्मचारी समावेशापासून वंचित राहू नये यासाठी स्कुटीनी समिती स्थापन करून त्यात संघटनेस सहभागी करण्यात यावे, तत्कालीन ग्रामपंचायत सेवेतील सर्व कर्मचार्यांचा नगरपरीषदेच्या मंजूर आकृती बंधात समावेश करण्यात यावा, सर्व कर्मचार्यांच्या पी.एफ. खात्यातील त्रृटी दूर करून खाती अद्ययावत करण्यात याव्या, न्यायाधीश, कामगार न्यायालय जळगाव यांच्या निर्णय आदेशाचे पालन करून थकित वेतन एकरकमी अदा करण्यात यावे, लाड कमिटीच्या शिफारसीनुसार निवृत्त सफाई कामगारांच्या वारसास सेवेत सामावून घेण्यात यावे, पाणीपुरवठा कामगारांना सप्टेंबर 2014 पासून आजपर्यत एकही साप्ताहीक सुटी दिलेली नाही तर आजपर्यतच्या साप्ताहिक सूटयांचा डबल मोबदला रोखीने अदा करण्यात यावा आणि नियमित साप्ताहिक सुटिची व्यवस्था करण्यात यावी या कर्मचारी हितकारक मागण्या असून 6 जूनपर्यत किंवा तत्पूर्वी मंजूर करून कर्मचारी हिताचे निर्णय घ्यावा आदी मागण्या संघटनेने मान्य करण्याची मागणी केली आहे.
मागण्या मान्य केल्यास आंदोलन
मागण्या मान्य न झाल्यास 7 जून रोजी सकाळी 9 वाजेपासून आमरण उपोषण छेडले जाणार आहेत. आंदोलनात संघटना जिल्हाध्यक्ष अनंत गडे सह संजय माळी, सुधाकर मराठे, गजानन तळेले, शंकर झोपे, गोकूळ भोई, अनिल चौधरी, संतोष वानखेडे, सुनिल तायडे , गणेश कोळी, गंभिर कोळी, गौतम इंगळे, रविकांत नारखेडे , सुरेश शेळके, राजेंद्र गायकवाड, गणेश कौरीसंकत, मुक्तार अहमद, सोपान भोळे, श्रीकृष्ण माळी, सुरेखा मराठे, संगीता भैसे, भगवती कौरीसंकत, अरूण सुर्यवंशी आदी सहभागी होणार आहेत.