मान्सून थांबला? :ऑगस्ट कोरडाच

0

मुंबई:ऑगस्टमध्ये मात्र मुंबईत ६२ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे . ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने मुंबईकरांना पावसाळ्याच्या ऋतूची केवळ अधून-मधूनच जाणीव झाली.

प्रादेशिक हवामान विभागाच्या आकेडवारीनुसार ऑगस्टमध्ये सांताक्रूझ येथे २२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सरासरी गाठण्यासाठी सांताक्रूझ येथे ५८५ मिमी  पाऊस अपेक्षित होता. त्यामुळे हा पाऊस संपूर्ण महिन्याच्या अपेक्षित पावसाच्या केवळ ३८ टक्के होता. मात्र जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसाने तलावक्षेत्रामध्ये पुरेसे पाणी जमा झाले असून, सध्या ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे.

मुंबईत ऑगस्टमध्ये झालेला पाऊस गेल्या दहा वर्षांमधील सर्वात कमी दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस आहे. यापूर्वी सन २०१५च्या ऑगस्टमध्ये १५३.९ मिमी पाऊस झाला होता. यंदाचा ऑगस्ट महिन्यातील पाऊस हा गेल्या वर्षीच्या पावसाच्या अगदी विरोधी स्वरूपाचा आहे. गेल्या वर्षी २९ ऑगस्ट ते ३० ऑगस्टच्या २४ तासांत ३३१ मिमी पाऊस झाला होता.