बंगळूरू: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क भारतातील रस्त्यावर रिक्षा चालवताना दिसला आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये मायकल क्लार्क रिक्षा चालवायचे शिकत असल्याचे दिसते. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती क्लार्कला रिक्षा कशी चालवायची सांगत आहे, त्याच्या माहितीनंतर क्लार्क बंगळूरुच्या रस्त्यावर रिक्षा घेऊन गेल्याचे दिसते आहे.
रिक्षा चालवायचे शिकत आहे, ज्या शहरातून माझ्या क्रिकेट करिअरची सुरुवात झाली त्या शहरात परत आल्याचा आनंद झाला आहे. असे त्या व्हिडिओ खाली क्लार्कने लिहले आहे. दरम्यान, 2004 मध्ये बंगळूरुमधून मायकल क्लार्कने आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शतक भारताविरुद्ध शतक ठोकले होते. पुणे येथे झालेल्या पहिल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान क्लार्क कॉमेंट्री करताना दिसला होता.