मायक्रोसॉफ्टची भारतातील नेटवर्किंग इन्स्टिट्युटला मदत

0

मुंबई| स्किल इंडियाच्या प्रभावामुळे सूचना व तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तरोत्तर क्रांती होताना दिसत आहे. आपल्या दैनंदिनीमधील प्रत्येक काम आता डिजिटल होत आहे. जगातील सगळ्यात मोठी सॉफ्टवेअर कंपनी ’मायक्रोसॉफ्ट’शी संलग्न होऊन जेटकिंगने डिजिटल कोर्सेसची सुरूवात केली आहे. कौशल्यपूर्ण भारत या संकल्पनेच्या अनुषंगाने भारतातील अनेक संस्था सध्या बड्या कंपन्यांशी शिक्षणासाठी करार करत आहेत. यापैकी एक असलेली ’जेटकिंग’ या संस्थेत मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सोल्युशन्स एक्सपर्ट हा कोर्स सुरू करण्यात आला आहे.

कार्यक्षम व आधुनिक डेटा सेंटर चालवण्यासाठी, आयडेंटिटी मॅनेजमेंट, सिस्टीम मॅनेजमेंट, व्हर्च्युलायझेशन, स्टोरेज व नेटवर्किंग ही या कोर्सची वैशिष्ट्ये आहेत. आयटी इंडस्ट्रीमध्ये या कौशल्याची दिवसेंदिवस गरज भासत आहे. मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड या कोर्ससाठी जेटकिंगमधील एक्सपर्ट प्राध्यापकांची निवड करण्यात आली आहे. डिजिटल डोमेनमधील कमतरतेची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक बाबींवर या कोर्समध्ये भर दिला जाणार आहे. बारावीनंतर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचे प्राथमिक ज्ञान असणारे विद्यार्थी या कोर्सनंतर उत्तम करियर घडवू शकतात.