नवी दिल्ली – माहिती तंत्रज्ञानातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टमध्ये ४००० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. या गंडांतराबद्दल कंपनीतील विक्री आणि पणन विभागात होत असलेल्या पुनर्रचनेमुळे हे सर्व होत आहे, असे कंपनी म्हणत आहे.
सध्या अमेरिकेबाहेरील कंपनीच्या शाखांमध्ये नोकरी कपात होत आहे.मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याने कंपनीच्या ग्राहकांना आणि भागीदारांना चांगली सेवा देण्यासाठी बदल करण्यात येत आहे. त्यामुळेच काही कर्मचाऱ्यांच्या पदांबाबत कंपनी विचार करीत आहे. कदाचित त्यांना नोकरी सोडावी लागेल. इतर कंपन्यांप्रमाणे मायक्रोसॉफ्टही व्यवसायाचे मूल्यांकन नियमितपणे करीत असते. यामुळे कंपनीच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक वाढू शकेल आणि काही जणांना पुन्हा नोकरीही देता येईल, असा आशावादही मायक्रोसॉफ्टने व्यक्त केला आहे. मायक्रोसॉफ्ट अमेरिकेत ७१ हजार तर जगात एक लाख २१ हजार कर्मचारी आहेत.