मायदेशी परताच उजमाने केले मातीला वंदन

0

नवी दिल्ली । पाकिस्तान जबरदस्तीने विवाह करण्यात आल्याचा आरोप करणारी भारतीय महिला उजमा अखेर गुरुवारी मायदेशी परतली. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर उजमाने अटारी वाघा सिमेवरुन भारतात प्रवेश केला. भारतीय हद्दीत येताच उजमाने भूमीला वंदन केले. मुळची दिल्लीची असणार्‍या 20 वर्षीय उजमाला पोलिस बंदोबस्तात वाघा सिमेवर सोेडावे असा आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. उजमा भारतात दाखल होताचा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करुन तिचे स्वागत केले आणि माफीही मागितली. भारताची मुलगी, उजमा हिचे घरी स्वागत आहे. पाकिस्तानात ज्या परिस्थीतीचा सामना करावा लागला त्याबद्दल मी तुझी माफी मागत, असे सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर म्हंटले. पाकिस्तानात उजामाने भारतीय दुतावासात आश्रय घेत, मदतीची मागणी केली होती. त्यानंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने उजमाला वाघा सिमेपर्यंत संरक्शण देण्याचा आदेश दिला होता. पाकिस्तान हा मौत का कुआँ असून तिथे जाणे सोपे पण परतणे कठीण असल्याचे उजमाने भारतात आल्यानंतर सांगितले.

नातेवाइकांच्या भेटीसाठी पाकिस्तानात
विवाह करण्यासाठी पाकिस्तानला चाललेय असे उजमाने सांगितले नव्हते. नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तान जात असल्याचे उजमाने व्हिसा मिळवताना सांगितले असे पाकिस्तानी अधिकार्‍यांनी न्यायालयात स्पष्ट केले. मागील आठवड्यात उजमाने भारतीय दुतावासाशी संपर्क करुन मायदेशी परत जायचे आहे असे सांगितले.

पाककडून मदतीचे आश्‍वासन
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या नफीस झकारीया यांनी सांगितले की, भारतीय नागरिक उजमा हिने संपर्क साधून मायदेशी परत जायचे आहे असे, भारतीय दुतावासाने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला कळवले होते. कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावर तीला परत जाता येईल असे कळवण्यात आले होते.

उम्मीद से ज्यादा
उजमा भारतात सुखरुप परतल्यावर भारत सरकारने उम्मीदसे जादा मदत केल्याचे तिचा भाऊ वसिम अहमदने सांगितले. वसिमने केंद्र सरकार आणि विशेषत: सुषमा स्वराज यांचे खूप आभार मानले.

न्यायालयात याचिका
उजमाने इस्लामाबाद उच्च न्यायालयात पती ताहिर अलीविरुद्ध एक याचिका दाखल केली आहे. ताहिर आपल्यावर अत्याचार करुन धमकावत असल्याचा आरोप उजमाने या याचिकेत केला होता. उजमाने यासंदर्भात न्यायदंडाधिकार्‍यांकडे साक्शही दिली होती. उजमाने आपली इमिग्रेशनशी संबधीत सर्व कागदपत्रेही ताहिरने ताब्यात घेतली असल्याचा आरोप केला होता. सुरक्शीतपणे भारतात परतेपर्यंत इस्लामाबाद मधील भारतीय दुतावासातून बाहेर पडणार नसल्याचे उजमाने सांगितले होते.