जळगाव: शहरातील भारत दूरसंचार विभागाच्या कार्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी अचानक प्रकृती खालावलेल्या मायलेकींना पोलिसांच्या सतर्कतेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
दोघेही बारा दिवसांपूर्वी पुण्यातून जळगावात परतल्या असून त्यांना कोरोना सदृश लक्षणे असल्याने तातडीने दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघीही मायलेकी बारा दिवसांपूर्वी पुण्यातून शहरात परतलेल्या आहेत शुक्रवारी त्या मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आल्या होत्या खरेदी करून पदस्थांना अचानक भारत दूरसंचार विभागाच्या कार्यालयासमोर त्यांची प्रकृती खालावली. गस्तीवर असलेल्या जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना प्रकार लक्ष झाला असता त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवुन दोघांना जिल्हा रुग्णालयात तपासासाठी दाखल केल्याची माहिती मिळाली आहे . शेवटच्या वृत्त हाती आले तोवर त्यांची तपासणी सुरू होती.