मायावती, अखिलेश यादव महाआघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नाही !

0

लखनऊ- भारतीय जनता पार्टी विरोधात एकत्र होण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधी पक्षाला धक्के बसण्याला सुरुवात झाली आहे. आज नवी दिल्लीत महाआघाडीची बैठकीत बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव सहभागी होणार नाही. बैठकीत तेलुगू देशम पार्टी प्रमुख आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी बोलविली आहे.

समाजवादी पार्टीकडून अखिलेश यादव यांच्या जागी मुलायम सिंह यादव किंवा रामगोपाल यादव उपस्थित राहू शकतात. पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालापूर्वी विचारमंथन करण्यासाठी ही बैठक बोलविण्यात आली आहे. मायावती कॉंग्रेसवर नाराज आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये बसपासोबत जागा वाटपावरून बिनसल्याने मायावती नाराज आहेत.

या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बनर्जी, नॅशनल कॉफ्रेंसचे प्रमुख फारूक अब्दुल्ला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव सीताराम येचुरी,भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा)चे महासचिव एस सुधाकर रेड्डी, डीएमके अध्यक्ष एमके स्टालिन, राष्ट्रीय जनता दलचे तेजस्वी यादव, लोकतांत्रिक जनता दलचे शरद यादव आदींची उपस्थिती असणार आहे.