माया धुप्पड यांना आव्हाड वाड्ःमय पुरस्कार प्रदान

0

जळगाव। खान्देशातील सुप्रसिध्द कवियत्री माया धुप्पड यांना सावल्यांचं गाव या बालकविता संग्रहासाठी पार्वताबाई आव्हाड उत्कृष्ट बालवाड्मय राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. रविवारी 11 जुनला साने गुरूजी यांच्या स्मृतिदिनाच्या औचीत्यावर मुंबई शहरातील सांताक्रुझ येथील सानेगुरूजी आरोग्य मंदिरात हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशांक अवसरे, मानद सचिव स्नेहलता मळेकर, एकनाथ आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होेते. दरम्यान, कार्यक्रमात धुप्पड यांना पार्वताबाई आव्हाड उत्कृष्ट बालवाड्मय राज्यस्तरीय पुरस्कार व सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्हे देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना धुप्पड म्हणाल्या की, साने गुरूजींच्या स्मृतिदिना बालकवितेला मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी मोलाचा आहे. कारण साने गुरूजी फुलामुलांचे कवी होते, असे त्यांनी सांगितले.