माय जॉब फेअरचे मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात उदघाटन

0

जळगाव-सिद्धिविनायक समूहाचे चेअरमन कुंदन ढाके, केसीई सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावातील केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित भव्य अश्या माय जॉब फेअर या महारोजगार मेळाव्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात उदघाटन करण्यात आले. या वेळी आमदार राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, सिद्धिविनायक समूहाचे चेअरमन कुंदन ढाके, दैनिक जनशक्तीचे व्यवस्थापकीय संचालक किरण चौधरी, यतीन ढाके आदींसह मान्यवर उपस्थिती होते. या जॉब फेअरमध्ये सुमारे 4 हजार तरुणांची उपस्थिती अपेक्षित आहे. नोंदणीकृत उमेदवारांच्या मुलाखती काहीवेळात सुरू होणार आहे. नोंदणीसाठी आएमआर महाविद्यालयात वयवस्था करण्यात आलेली आहे.