जळगाव – सिद्धिविनायक गृप आणि खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित माय जॉब फेअर २०१८ ला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली असून सकाळपासूनच तरुणांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मुलाखतींना सुरुवात झाली आहे. १५ डिसेंबर आणि १६ डिसेंबर २०१८ या दोन दिवसीय जॉब फेअरचे शनिवारी मान्यवरांच्या हस्ते थाटात उदघाटन झाले. यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, सिद्धिविनायक गृपचे चेअरमन कुंदन ढाके आदी उपस्थित होते.
उमेदवारांची सकाळपासूनच गर्दी
सिद्धिविनायक गृपतर्फे तरूणांना ऑनलाईन नोंदणीसाठी ॲप वेबसाईट याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
त्यानुसार उमेदवाराने नोंदणी करून सकाळपासूनच केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात गर्दी केली होती. महाविद्यालयात नियुक्त प्रतिनिधींकडून उमेदवारांची गैरसोय होवू नये म्हणून वेळोवेळी सुचना देण्यात येत होत्या.