मारवडसह परीसरातील 52 गावांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश?

0

अमळनेर। तालुक्यातील मारवडसह 52 गावांचा लवकरच मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश होणार असून या संदर्भात अधिवेशनात मांडलेल्या लक्षवेधीला सकारात्मक उत्तर मिळाले आहे. या योजनेंतर्गत संबंधित गावांना पाणीपुरवठा योजनांसाठी मोठा निधी मिळून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास आमदार शिरीष चौधरी यांनी मारवाड येथे ग्रामपंचायतीच्यावतीने शवपेटी लोकार्पण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केला. आमदार शिरिषदादा चौधरी मित्र परिवारातील कार्यकर्ते उमेश साळुंखे यांनी वडील कै. राजाराम साळुंखे यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत कार्यालयास शवपेटीचे लोकार्पण आमदार चौधरी यांच्यहस्ते करण्यात आले.

सुतगिरणीचे शेअर्स खरेदी करण्याचे केले आवाहन
ग्रामपंचायत कार्यालयातील शिवाजी महाराज सभागृहात अध्यक्षीय मनोगतात आमदार चौधरी यांनी उमेश साळुंखे यांच्या दातृत्वाचे कौतुक करून याच पद्धतीने जनहितासाठी सधन कुटुंबीयांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. ज्याप्रमाणे पालिकेच्या माध्यमातून आम्ही अमळनेर शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला त्याचप्रमाणे ग्रामीण भागाचाही पाणी प्रश्न सोडवायचा असून मुख्यमंत्री पेयजल योजना ग्रामीनसाठी वरदान ठरेल, बोहरा उपसा सिंचन योजना संदर्भात शासनदरबारी पाठपुरावा केल्याने यशस्वी बैठक झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. यावेळी रोजगारासाठी हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रवींद्र चौधरी यांच्या प्रयत्नातून उभारत असलेल्या सुतगिरणीचे शेअर्स खरेदी करण्याचे आवाहन केले.

लोकार्पण सोहळ्यास यांची उपस्थिती
याप्रसंगी सरपंच वसंतराव चुडामण पाटील, अध्यक्ष ग्राम विकास संस्था जयंतराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम साळुंखे, उमेश साळुंखे, नगरसेवक प्रा अशोक पवार, आरिफ भाया, गुलाम नबी, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य छबिलाल पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, संचालक वि का सो रविंद्र पाटील, कांतीलाल चौधरी, आनंदा चौधरी, सदाशिव पाटील, शरद साळुंखे, विनोद चौधरी, चंद्रकांत साळुंखे, नंदकिशोर चौधरी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ, आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.