मारवड शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी जयवंतराव पाटील

0

अमळनेर : तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळाची अध्यक्ष व कार्यकारी संचालक पदाची पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पँनलचा दणदणीत विजय होवून त्यांचे प्रतिस्पर्धी संस्था बचाव पँनलचा दारुन पराभव झाला. प्रगती पँनलचे नेतृत्व विद्यमान अध्यक्ष जयवंतराव मन्साराम पाटील यांनी केले तर संस्था पँनलचे नेतृत्व विद्यमान सरपंच वसंतराव चूडामन पाटील यांनी केले संस्थेच्या इतिहासात सन 1965 नतंर प्रथम निवडणूक घेण्यात आली.

संस्था बचाव पँनलचा दारुन पराभव
या निवडणुकीत संचालक मंडळ व अध्यक्ष पदासाठी दोघेही पँनलचे एकूण 22 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी प्रगती पँनलचे सर्व 11 उमेदवार भरघोस मतानी विजयी झाले. अध्यक्ष पदाकरिता जयवंत मन्साराम पाटील यांना 586 मते (विजयी) त्यांचे प्रतिस्पर्धी वसंत चूड़ामन पाटील 273 मते मिळाली.संचालक पदासाठी प्रगती पँनल चे लोटन फकीरा पाटील 555 मते, देवीदास शामराव पाटील 586, युवराज काशिनाथ पाटील 556, शरद भालचंद्र पाटील 532, विनय बापूराव पाटील 516, दिनेश भाऊराव शिसोदे 583, देवीदास बारकु पाटील 558, महारु रामदास शिसोदे 583, लोटन शिवदास पाटील 542, सुरेश भिमराव शिंदे 540 मते मिळाली असून सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.तर त्यांच्या विरोधात असलेले संस्था बचाव पँनलच्या सर्व पराभूत उमेदवाराना मिळालेली मते अरविंद वासुदेव साळुखे, अनिल साहेबराव पाटील, अशोक नथ्थू पाटील, प्रभाकर रावसाहेब पाटील, विजयानंद भाऊराव पाटील, दगडु तुकाराम पाटील, पुंजु वंजी पाटील, प्रकाश अमृत राव पाटील, बापू बंडू पाटील, सुनिल रघुनाथ पाटील अशी मते मिळाली या निवडणूकी बाबत मारवड पंचक्रोशित मोठी उत्सुकता होती.