चाळीसगाव । तालुक्यातील शिंदी चत्रभुज तांडा येथे 28 एप्रिल रोजी सकाळी दोघांमध्ये भांडण झाले होते. यात उसनवारीचे पैसे दिले नाही म्हणून तिघांनी मारहाण केली तर मागील भांडण उकरून काढून दोघांनी डोक्यात लोखंडी गज मारून जखमी केले.
याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात परस्पराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहिती नुसार आरोपी शरद राजाराम काळे व भूषण शरद काळे रा. चत्रभुज तांडा ता चाळीसगाव यांनी मागील भांडण उकरुन काढुन फिर्यादी मछिंद्र उत्तम ठाकरे (29) रा चत्रभुज तांडा ता चाळीसगाव यांना त्यांच्या घरासमोर दमदाटी करुन शिवीगाळ केली. शरद राजाराम काळे याने त्यांच्या डोक्यावर लोखंडी गज मारुन दुखापत केली तर भूषण शरद काळे याने डाव्या खांद्यावर काठी मारुन दुखापत केल्याप्रकरणी दोघांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास हवालदार दिलीप रोकडे करित आहेत. दुसर्या घटनेत आरोपी अनिल ठाकरे याने फिर्यादी शरद राजाराम काळे यांच्याकडे उसनवार पैसे मागितले होते. ते दिले नाही याचा राग आला म्हणून त्यांच्या डाव्या हाताच्या अगठ्यावर व बोटावर मारु दुखापत केली.
तर मच्छिंद्र उत्तम ठाकरे, परमेश्वर ठाकरे यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली म्हणून वरील तिघा आरोपी विरोधात चाळीसगांव ग्रामीण पोलिस स्टेशन ला गु र न 32/2017 भा द वि कलम 324 .323 .504 .506. 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.