मारहाणीचा जाब विचारल्याने तरुणाला बेदम मारहाण : चौघांविरोधात गुन्हा

जळगाव : लहान मुलीला मारण्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणाला लाकडी दांडाने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना तालुक्यातील कुसुंबा येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ घडली. या प्रकरणी शुक्रवार, 25 फेब्रुवारी रोजी सकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
रवींद्र शांताराम कोळी (26, रा.ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, कुसुंबा, ता.जि.जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून रवींद्र कोळी यांचा मुलगा करणने शुक्रवार, 25 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता शेजारी राहणार्‍या कविताबाई (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या लहान मुलीला मारले. याबाबत रवींद्र कोळी हे कविताबाई यांना समजविण्यासाठी गेल्यानंतर कविताबाई, संगीता यशवंत पाटील, कविताबाईचा भाऊ आणि संगीताबाईचा मुलगा (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा.कुसुंबा, ता.जळगाव) यांनी शिविगाळ केली तर संगीताचा मुलगा याने रवींद्र कोळी यांचे दोन्ही हात पकडून लाकडी दांडक्याने डोक्याला बेदम मारहाण केली. या घटनेत रवींद्र कोळी हे जखमी झाल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर चौघांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गफूर तडवी करीत आहे.