नवी दिल्ली । देशातील मारहाण, खून या सारख्या घटनांनी प्रियंका गांधी-वड्रा संतप्त झाल्या असून मारहाण करून हत्या करणार्या घटनांचा मला खूप राग येतो आणि माझे रक्त तापायला लागते, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नॅशनल हेरॉल्डच्या स्मरणीकेच्या प्रकाशनप्रसंगी माध्यमांशी त्या बोलत होत्या.
रक्त खवळायलाच हवे
सावधानतेच्या नावाखाली मारहाण करून हत्या करण्याच्या घटनांबाबत तुमचे मतही आई सोनिया गांधी यांच्याप्रमाणेच आहे का? असा प्रश्न त्यांना केला असता, माझेही विचार त्यांच्यासारखेच आहेत. अशा घटनांबद्दल ऐकले की मला प्रचंड राग येतो. टीव्ही, इंटरनेटवर या गोष्टींबद्दल ऐकले, की माझे रक्त खवळते. चांगला विचार करणार्या प्रत्येकाचेच रक्त खवळायला हवे, असेही त्या म्हणाल्या.
देश हा घरातील माणसांकडूनच प्रचंड दहशतीखाली आला आहे. सर्वसमावेशक देशाच्या संकल्पनेवर मोठे हल्ले चढवले गेले आहेत. सध्याच्या काळात राष्ट्र मोठ्या आव्हानांचा सामना करत आहे.
– सोनिया गांधी,
काँग्रेस पक्षाध्यक्षा