मारहाणीतील पसार आरोपीस वर्षभरानंतर अटक

0

भुसावळ : तालुका पोलीस ठाण्यात दाखल मारहाणीच्या गुन्ह्यातील पसार झालेल्या संशयीत आरोपीस बाजारपेठ पोलीस ठाण्यातील डीबी पोलिसांनी अटक केली. सदानंद तुकाराम अट्रावलकर (32, साकेगाव, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीस एएसआय आनंदसिंग पाटील, शंकर पाटील, विकास सातदिवे, प्रेमचंद सपकाळे, किरण बाविस्कर यांनी त्यास अटक केली.