मारहाणीत आदिवासीचा मृत्यू

0

मोखाडा : तालूक्यातील मौजे सडकवाडी येथे दारू पिवून किरकोळ वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत होवून मौजे डोल्हारा येथील लक्ष्मन दगडू वळवी (55) या आदिवासी कातकरी व्यक्तिला आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत खुनाची फिर्याद दाखल होवून मोखाडा पोलीसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून जव्हार दिवानी न्यायालयात पोलीस कस्टडीची मागणी केलेली आहे. दीपक भाऊ कुरबूडे (25), ज्ञानेश्वर भाऊ कुरबूडे (23) व योगेश भाऊ कुरबूडे (21) सर्व रहाणार सडकवाडी या तीघांनी लक्ष्मन वळवी याच्या पोटात लाथा बुक्क्यांनी अमानूष मार केली होती.