मारहाण करणार्‍या चौघांना अटक

0

जळगाव । जुन्या जळगावमधील पाच ते सहा दुचाकीस्वारांनी आसोदा रेल्वेगेट उघडले नाही म्हणुन गेटमनला मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री 10.30 वाजता घडली. या गुन्ह्यात शनीपेठ पोलीसांनी चौघांना अटक केली आहे.

भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयाजवळ सौरभ सुभाष भारंबे राहतात. सौरभ भारंबे हे आसोदा रेल्वे गेटवर गेटमन म्हणुन कार्यरत आहेत. बुधवारी रात्री मालगाडी व एक विशेष रेल्वे गाडी गेल्याने गेट बंद करण्यात आले होते. यावेळी सौरभ भारंबे यांच्याशी पांढर्या रंगाची ऍक्टीव्हा क्रमांक एम.एच.19 सी.क्यू.2870 वरील दोन तरुणांनी वाद घातला. या वादानंतर दोघं तरुणानी आपल्या पाच ते सहा मित्रांना बोलावून सौरभ भारंबे यांना मारहाण केली.

चौघांची जामीनावर सुटका
या प्रकरणी शनिपेठ पोलीसांत शासकिय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयीतांना तपासधिकारी सपोनि सुनिल बेंद्रे यांनी पथक तयार करुन शोध घेतला. यामध्ये किशोर अशोक सोनवणे (वय 25), देवेंद्र दत्तात्रय सोनवणे (वय 28), गणेश उर्फ बबलु रामचंद्र कोळी (वय 29), महेंद्र सुरेश सोनवणे (वय 32) यांना सापळा लावुन अटक करण्यात आली आहे. यानंतर चौघांना मंगळवारी दुपारी न्यायाधीश आर.बी. ठाकूर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. चौघांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला असता तो देखील मंजूर करण्यात येवून चौघांची जामीनावर सुटका झाली.