कल्याण : कल्याण-डोंबिवलीमध्ये चोरट्यांची दहशत दिवसागणिक वाढत आहे. डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरात फेज सातमधील मीनाश्री केमिकल इंडस्ट्री या कंपनीत शनिवारी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटे कंपनीचे लॉक दगडाने तोडून घुसले. यावेळी कंपनीत काम करत असलेल्या तीन महिलांनी त्यांना विरोध केला. मात्र या चोरट्याने त्यांना मारहाण करत कंपनीच्या ड्रॉवरमधील 3 हजार 580 रुपयांची रोकड चोरून पसार झाले. या प्रकरणी मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहे.