जळगाव । भुसावळ येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी मिलिंद जागो सोनवणे यांना काही कारण नसतांना अमानुष मारहाण केली असून या पोलीसांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन सोमवारी पोलिस अधिक्षकांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे देण्यात आले आहे. निवेदनात म्हटलेले असे की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टीचे महानगर युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे हे भुसावळ येथे मित्र स्वप्निल देशमुख यांच्यासोबत वॉरंट रद्द करण्यासाठी गेले होते. यावेळी पोलिस ठाण्यातील पीएसआय नेमाने दोघांना हाकलून लावत मारहाण केली. यानंतर प्रभारी पोलिस निरीक्षक पाटील यांच्यासह हवालदार सुरळकर यांनी मारहाण केली व सोनवणे यांचे फिर्यादी 14 हजार रुपये काढून घेतले. त्यामुळे पोनि पाटील, पीएसआय नेमाने व दोन्ही हवालदारांना त्वरित निलंबित करुन कारवाई करावी, अशी मागणी रिपाइंतर्फे करण्यात आली आहे.