जळगाव । पाचोरा पोलीस स्थानकाचे पीएसआय यांच्यावर 13 जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पाचोरा पोलीसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी या प्रकरणामधील तिघांना अटक केले होते. जिल्हा सत्र न्यायालयात तिघांनी जामीनासाठी अर्ज केला असता न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे. पीएसआय दत्तात्रय मारूती नलावडे यांच्यावर 13 जुलै रोजी आरोपी सागर विनोद अहिरे, अजय विनोद अहिरे आणि अशोक चौधरी यांनी मध्यरात्री हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली होती. तिघांना पाचोरा पोलीसांनी अटक केली होती. तिघांनी जामीनासाठी अर्ज केला असता जिल्हा न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांना कामकाज पाहिले.