धुळे : मारहाणीच्या गुन्ह्यात तब्बल तीन वर्षांपासून गुंगारा देणार्या आरोपीच्या धुळे गुन्हे शाखेने नकाणे तलाव भागातून मुसक्या आवळल्या आहेत. दिनेश उत्तम सोनवणे (28, रा.चितोड ता.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
मारहाणीच्या गुन्ह्यात संशयीत पसार
धुळे तालुका पोलिस ठाण्यात 23 मार्च 2019 रोजी संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चितोड येथील रहिवासी वंदनाबाई भगवान मोरे (वय 48) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल होता. चितोड गावात वंदनाबाई यांच्या घराजवळ आरोपींनी जमावासह एकत्र येत वंदनाबाई यांना शिविगाळ करुन डोक्यावर कुर्हाडीने मारुन जखमी केले होते तसेच त्यांच्या मुलासही डोक्यावर मारुन जखमी केले होते. यातील चार आरोपींना यापूर्वी अटक झाली होती तर संशयीत दिनेश सोनवणे हा पसार होता व तो मूळ ठिकाणचा पत्ता बदलून नकाणे तलाव परीसरातील एका टेकडीवर झोपडी करीत वास्तव्यास होता. पथकाने पहाटेच्या सुमारास आरोपी दिनेशला अटक केली.