भुसावळ । शहरातील रिंगरोड लगत असलेल्या घरकुल प्रकरणावरुन वाद झाल्याने अनिल राखुंडे यास पाच जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक केली. या पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
घरकुलाच्या जागेवरुन अनिल राखुंडे व काही जणांमध्ये वाद झाला होता. याचे रुपांतर हाणामारीत होऊन पापाराम रायसिंग पंडीत, आकाश रायसिंग पंडीत, धरमसिंग उर्फ गोलू रायसिंग पंडीत, तिलक मनोज चंडाले, नंदू उर्फ कालू राजेंद्र गोयट (सर्व रा. वाल्मिक नगर, भुसावळ) यांनी 10 रोजी मोरेश्वर नगरात जाऊन अनिल मारोती राखुंडे यास लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने या पाचही संशयीतांना शहर पोलीस ठाण्याचे एएसआय फारुख शेख यांच्या पथकाने 17 रोजी रात्री अटक केली. त्यांना मंगळवार 18 रोजी न्या. पाटील यांच्या दालनात हजर केले असता 21 एप्रिल पर्यर्ंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.