संसार उपयोगी वस्तू खाक ; रोकडही जळाली
फैजपूर :- मारुळ शिवारातील आदिवासी शेतमजूराच्या झोपडीला आग लागून झोपडीत असलेल्या नऊ बकऱ्या व संसार उपयोगी वस्तू व धान्य तसेच पाच हजार रुपयाची रोख रक्कम शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली.
रुपला पावरा हे कुटुंबासह मोलमजुरी करण्यासाठी बाहेर गेलेले होते. पण त्यांच्या झोपडीत नऊ बकऱ्या बांधून ठेवलेल्या होत्या. यावेळी झोपडीवजा घराच्या वरतून गेलेल्या. विजप्रवाह मुळे शॉर्ट सर्किट होऊन सोमवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान पावरा याच्या झोपडीला आग लागली या आगीत झोपडीत बांधलेल्या नऊ बकऱ्या पाच हजार रुपये पर्यंतची रक्कम संसार उपयोगी वस्तू असा एक लाखा पर्यंतचा ऐवज आगीच्या भक्ष स्थानी पडला.यावेळी अग्नाशामक बंबाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने पावरा कुटुंबीय झोपडीत नव्हते. घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन तसेच सपोली दत्तात्रेय निकम, पोलीस उपनिरीक्षक आधार निकुंभे, अर्जुन सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. यासंदर्भात पोलीस स्टेशनला अकस्मात आगेची नोंद करण्यात आली आहे.