नवी दिल्ली : जुलै महिन्यात मारूती सुझुकीच्या बालेनो कारने विक्रीचा उच्चांक गाठला आहे. आधी टॉप टेनमध्ये असलेल्या कारच्या विक्री मानांक मालिकेत पाचवी असलेली बालेनो एका महिन्यात तिसऱ्या स्थानावर आली. गेल्या महिन्यात १९ हजार १५३ बालेनो गाड्या विकून सुझुकीने पराक्रम केला.
जीएसटीमुळे एसयुव्ही गाड्यांच्या विक्रीत घट झाली होती. जुलै २०१७ मधील मारूती सुझुकीची एक लाख ६५ हजार गाड्यांची विक्री झाली होती. ही विक्रीतील २० टक्के वाढ आहे. बालेनो १२ प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्यात निरनिराळ्या प्रकारची तीन इंजिने, दोन इंधन पर्याय, दोन प्रकारचे गिअर पर्याय यांचा समावेश आहे. बालेनोची किंमत ५.२६ लाख रूपये ते ८.४३ लाख रूपयांदरम्यान आहे.