नवी दिल्ली । मारूती-सुझुकीने आपली नवी कोरी कार बलेनो आरएस नुकतेच बाजारात लॉन्च केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या गाडी येण्याची मोठी चर्चा होती. या गाडीची किंमत 8.69 लाख रुपये आहे. या कारसोबतच ‘मारूती-सुझुकी’ने हाय परफॉर्मन्स हॅचबॅक गाड्यांच्या प्रकारात एंट्री केली आहे. बलेनो आरएस हे मॉडेल पोलो जीटी आणि फिएट पुंटो अबर्थसारख्या गाड्यांना टक्कर देईल. सध्या ही गाडी पेट्रोल प्रकारात उपलब्ध असून सुरक्षेच्या दृष्टीने यात अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ‘बलेनो आरएस’ हा या कारचा स्पोर्टी अवतार आहे. ‘बलेनो’च्या आधीच्या मॉडेलला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे नवे मॉडेल गाजण्याची शक्यता आहे.
या गाडीत अनेक वैशिष्ट्य
या गाडीत अनेक वैशिष्ट्य आहे. त्यातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यात सुझुकीचे शक्तीशाली 1.0 लीटर बूस्टरजेट पेट्रोल इंजिन बसवण्यात आले आहे. या गाडीचे फ्रंट आणि रेअर बंपर नव्याने बसवण्यात आले आहेत तर गाडीला काळ्या रंगाचे ग्रील लावण्यात आले असून ब्लॅक अँलॉय व्हीलमुळे तिला स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. त्यामुळे नव्या तरूणाईला या गाडीच घेण्याची इच्छा नक्की होणार आहे. प्रीमियम हॅचबॅक प्रकारात ‘बलेनो’ कंपनीने लाँच केली होती. पादचार्यांच्या सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे. ड्युअल एअरबॅग्ज, सीटबेल्ट्ससोबतच यात डिस्क ब्रेक्सही बसवण्यात आले आहेत. बलेनो आरएसचा स्पोर्टी लूक युवावर्गाला आकर्षित करेल, अशी कंपनीची अपेक्षा आहे. गाड्यांच्या नव्या प्रकारात एंट्री केल्याने मारूतीकडून अपेक्षा वाढल्या आहेत.