चाळीसगाव । प्रांतविधी करून घराकडे परतत असलेल्या इसमाला मारोती कारने मागावून जोरात धडक दिल्याने अपघातात या 53 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना 17 एप्रिल 2017 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास तालुक्यातील वाघडु गावाच्या बाहेर वाकडी रोड वरील नदी पुलावर घडली होती. घटना घडल्यानंतर मारोती कार चालक वाहनासह पळून गेला होता. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याचे विरोधात 25 रोजी गुन्हा दाखल केला आहे.
मारोती कार चलकाविरूद्ध गुन्हा दाखल
तालुक्यातील वाघडु येथील शिवाजी दामू पाटील (53) हे 17 एप्रिल 2017 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास वाघडु गावाबाहेरील वाकडी रोड वर नदीच्या पुलावर शौचास जाऊन घराकडे परतत असतांना त्यांना वाकडी गावाकडून वाघडु गावाकडे भरधाव वेगाने जाणार्या मारोती व्हॅन (एमएच 41 सी 2386) ने मागावून जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. अपघात झाल्यानंतर चालकाने तेथून पळ काढला होता. त्यावेळी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला 21/2017 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती तर अज्ञात चालकाचा शोध सुरु केला होता. पोलिसांनी तपास करून वरील मारोती व्हॅन चा शोध घेऊन वरील मारोती कार चा चालक सतीश सुकदेव शिरसाठ (रा.वाकडी ता. चाळीसगाव) याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.