मार्केटमध्ये कुलूपबंद गाळा दाखवून जिंकला संशयिताने महिलेचा विश्‍वास

0

18 लाखात गंडविल्याचे प्रकरण 

सिंधी मालकाकडे कामाला असल्याची बतावणी करत फसवणूक

जळगावः जम्मू काश्मिरातील संशयित तरुणाने शहरातील पूनम चौधरी या महिलेला 18 लाखांत गंडविल्याचे प्रकरण समोर आले. यात संशयिताने सिंधी मालकाकडे कामाला असून मालकाचे फुले मार्केटमधील दुकान विकण्याचे आहे. ते मिळवून देण्यासाठी त्याने प्रत्यक्षात महिलेला मार्केटमध्ये कुलूपबंद गाळाही दाखविला व विश्‍वास जिंकत फसवणूक केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

ज्ञानदेव नगर येथील पूनम चौधरी यांनी शनिवारी शनिपेठ पोलीस स्टेशन गाठले. याठिकाणी जाहीद व तिच्यात नेमके पैसे किती दिले यावरुन गोंधळ झाला. केवळ 9 च लाख दिल्याचे जाहीदचे म्हणणे आहे तर चौधरी जाहीदला 18 लाख रुपये दिल्यावर ठाम आहे. मात्र त्यांच्याकडे 9 लाख दिल्याव्यतिरिक्त उर्वरीत रक्कम दिल्याचा कुठलाही हिशोब अथवा पुरावा तिच्याकडे नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे.

तीन वर्षापासून संशयित शहरात
संशयित जाहीद निसार ईट्टू (वय24, रा. डांगरपुरा, अहिबोहल, अनंतनाग, जम्मू काश्मिर) हा तरुण घरुन पळाल्यानंतर सुरुवातीला इगतपुरी येथे थांबला. यानंतर तो जळगाव शहरात पिंप्राळा हुडकोत त्यांच्या दुसरी आईकडे आला. याठिकाणी तरुण तीन वर्षापासून रहात होता. यादरम्यान काही कारणांवरुन त्याचे भांडण झाल्याने आईच्या ओळखीतूनच तो कालिंकामाता परिसरात एका नातेवाईकाकडे रहायला लागला होता.

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ओळखी
कालिकामाता परिसरात वास्तव्यास असताना तरुणाने एकदा महिलेला दुचाकीवरुन जाण्यासाठी लिफ्ट मागितली. महिलेने त्याला दुचाकीवरुन सोडले. या पहिली भेटीतून महिलेची व जाहिदची ओळखी झाली. यानंतर एकमेकांचा संपर्क क्रमांक घेतला. याच ओळखीतून त्याच्या भेटी वाढल्या यातून जाहीदने महिलेचा विश्‍वास संपादन केला. व तिची समस्या उडकून काढली. ति सोडविण्याच्या नादात म्हणजेच तिला गाळा मिळवून देण्याच्या आमिषाने गंडविले.

महिलेला भावासाठी घ्यायचे होते दुकान
ज्ञानदेवनगरातील पूनम चौधरी यांचा भाऊ पुण्याला कंपनीत कामाला आहे. तो आई वडीलांपासून दूर राहतो. त्याने जळगावात व्यवसाय करावा, तो व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक व्हावा, शहरात सेटल व्हावा या भावनेतून चौधरी या भावासाठी मार्केटमध्ये दुकान शोधत होते. यादरम्यान जाहीदने मी सिंधी मालकाकडे कामाला असून त्यांचा फुले मार्केटमध्ये दुकान आहे, चौधरी यांना सांगितले. यानंत प्रत्यक्षात एक बंद दुकान दाखवून हेच ते दुकान असून मालकाचा पुण्याचा मोठा व्यापार आहे, त्यांना दुकान विकायचे असल्याचे भासविले होते. यानंतर चौधरी यांच्या पुणे येथील भावाने शहरात येवून बंद दुकानही बघितले मात्र त्यावेळी जाहीदशी संपर्क न झाल्याने त्याची भेट झाली नव्हती. तोपर्यंत पूनम चौधरी यांना जाहीदला 9 लाख रुपये देवूनही टाकले होते. यानंतर त्याच्याशी संपर्कच न झाल्याने प्रकार उघडकीस आला.