मार्केटमध्ये सफरचंदाची चांगली आवक

0

नवी मुंबई – सध्या चीनच्या कृषीमालाला भारतात बंदी आहे. मात्र त्याचा परिणाम भारतीय कृषी बाजारपेठेवर झालेला नाही. चीनवरुन वाशीतील मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात सफरचंदाची आवक होत होती. मात्र 1 जूनपासून ती बंद झाली आहे. परंतू इतर देशातून सफरचंदाची चांगली आवक बाजारात होत असल्याने सफरचंदाचा बाजार सावरला आहे. वाशीच्या बाजारात चीन, न्यूझीलंड, वाशिंग्टनमधून सफरचंदाची आवक होत होती. आता वाशीमार्केटमध्ये इटली, स्पेन, पोलंड, अर्जेन्टिना, अमेरिका इराणमधून सफरचंदाची आवक सुरू झाली आहे.

भारतीय सफरचंदाचा हंगाम ऑगस्टपासून
भारतीय सफरचंदाचा हंगाम ऑगस्टपासून सुरू होईल. भारतीय सफरचंद येणे थांबले असल्याने परदेशी सफरचंदमोठ्या प्रमाणात बाजारात येत आहेत. हंगाम संपला की दरात वाढ होते. भारतीय सफरचंदाचा हंगाम 15 ऑगस्टपासून सुरू होईल. त्यानंतर आवकही वाढायला सुरुवात होईल. आवक वाढली की दरही खाली येतील, अशी माहिती फळांचे आयातदारांकडून सांगण्यात येत आहे. सध्या बाजारात सर्वच प्रकारच्या सफरचंदाचे दर 200 रुपये किलो झाले आहेत.