मार्केटिंग ऑफिसमधून 54 हजारांचा ऐवज लंपास

0
 चिंचवड : चोरट्यांनी शटर उचकटून एका मार्केटिंग ऑफिसमधून 54 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 13) सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे उघडकीस आली. महावीर शांतीसागर ओसवाल (वय 29, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओसवाल यांचे चिंचवड येथे सन एज मार्केंटिंग नावाने ऑफिस आहे. बुधवारी त्यांचा ऑफिसमध्ये काम करणारा मुलगा नेहमीप्रमाणे सायंकाळी सातच्या सुमारास ऑफिस बंद करून घरी गेला. दरम्यान चोरटयांनी रात्री ऑफिसचे शटर उचकटनू आतील 54 हजार 270 रुपयांचे साहित्य चोरून नेले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शेवाळे करीत आहेत.