शेंदुर्णी । जामनेर तालुक्यातील मालखेडा येथे मंगळवार 3 जानेवारी 2017 रोजी वैभव अ हेल्पेज हँड गृप नासिक व ग्रामपंचायत मालखेडा यांचे सयुक्त विद्यमाने भव्य रोगनिदान, औषधी वाटप व रक्तदान शिबीराचे उद्घाटन जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी छगन झाल्टे, नाचणखेडा सरपंच राजेद्र चौधरी, आरोग्यदुत अरविंद देशमुख, भाजपा शेदुर्णी नाचणखेडा गटप्रमुख यशवंत पाटील, तालुका सरचिटणीस रजनीकांत शुक्ला, गण प्रमुख श्रावण पाटील, बिलवाडी उपसरपंच भरत राजपुत, मेणगांव सरपंच बाळु धुमाळ, मोराड सरपंच प्रकाश राठोड, मालखेडा सरपंच कलाबाई इंद्रजीत पवार, इमाम शेख, इंद्रजीत पवार यांची प्रमुख उपस्थित होती.
तपासणी करून औषधीचे वाटप
यावेळी डॉ.सचिन पवार, डॉ.आदित्य पाटील, डॉ.अक्षय पाटील, डॉ.सुयोग पाटील, डॉ.विजय राठोड, डॉ.योगेश मसे, डॉ.पार्थ भद्रा, डॉ.सचिन म्हात्रे यांनी रुग्णांची वेगवेगळ्या आजारांची तपासणी करून औषधीचे वाटप करण्यात आले. यावेळी या शिबीरात त्याचा 426 रुग्णांनी लाभ घेतला. तसेच गोळवलकर रक्तपेढी जळगांव वतीने रक्तदान शिबीरात 23 रक्त दात्याचे रक्त संकलीत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच कस्तुराबाई राठोड व सदस्य अर्जुन नाईक, यशोदाबाई राठोड, जिजाबाई राठोड, सरीचंद नाईक, सोनुसिंग राठोड यांचे व गावकर्याचे मोलाचे सहकार्य लाभले.