मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरले

0

भुसावळ । मध्य प्रदेशातील इटारसीकडून येणारी बीसीएन/एचएल या मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातामुळे मध्य रेल्वेची या मार्गावरील प्रवासी आणि मालवाहतूक विस्कळीत झाली होती. डबे रुळावरुन घसरण्याची घटना भुसावळ विभागातील सावदा रेल्वेस्थानकातील अप लाईनवर घडली. या घटनेमुळे अप मार्गावरील मुंबईकडे जाणार्‍या गाड्यांना अनेक तास उशीर झाला. दरम्यान, पहाटे 4.30 अपघातग्रस्त डबे रुळावरुन रात्रीच युद्ध पातळीवर काम करुन रात्रीच उचलण्यात आले आहेत. गुरुवारी पहाटे 4.30 वाजता अप मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. मालगाडीचे डबे घसरल्याची माहिती मिळताच भुसावळ येथून तातडीने एसीआर गाडी (अ‍ॅक्सीडेंट रिलिफ ट्रेन) अपघात स्थळी रवाना झाली. संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी थांबून होते. डीआरएम आर.के.यादव, एडीआरएम अरुण धार्मिक, सिनिअर डीसीएम सुनील मिश्रा आदी अधिकारी डीआरएम कार्यालयातील नियंत्रण कक्षात लक्ष ठेवून होते. पहाटे 4.30 वाजता वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

या गाड्या धावल्या उशिरा
दिल्लीकडून येणारी (अप मार्गावरील) 12630 स्वर्ण जयंती एक्स्प्रेस, 12618 मंगला एक्स्प्रेस, 13201 जनता एक्स्प्रेस, 12321 हावडा मेल व्हाया अलाहाबाद, 12187 गरीब रथ 15101 जनसाधारण एक्स्प्रेस या गाड्यांना चार-ते पाच तास विलंब झाला. त्याउशीराने धावत आहेत. पहाटे अडीच वाजता जाणारी गरीब रथ सकाळी 7 वाजता येथून रवाना झाल्या. दरम्यान प्रवश्यांचे प्रवासात काही फरक पडला नाही.