जामनेर। तालूक्यातील मालदाभाडी येथे हॉनेस्ट डेरिव्हेडीज प्रा.लि.(स्टार्च प्रकल्प) व महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळांच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी स्टार्च प्रकल्पात कामगार मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी कुंदन खेडकर व केंद्र प्रमूख शेख रियाजुद्दीन यांनी उपस्थित कामगार बांधवांना शासनाच्या विवीध कल्याणकारी योजनांबद्दल सविस्तर माहीती आपल्या मार्गदर्शनातून सांगितली. तसेच हॉनेस्ट प्रकल्पाचे उपाध्यक्ष रवि जजोडीया यांनीही कामगारांना विवीध योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी हॉनेस्टचे महाव्यवस्थापक सुनील जोशी, संजय धांडे, नितीन पाटील आदी मान्यवरांसह कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.