जामनेर। मालदाभाडी ता.जामनेर येथील मक्यावर प्रक्रिया करणार्या स्टार्च फॅक्टरीमध्ये एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागून शेकडो क्विंटल मक्याचे पशुखाद्य या आगीमध्ये जळून खाक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. घटनेची खबर मिळताच महिला पोलिस निरीक्षक माधुरी बोरसे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. आग लागल्याची वार्ता समजताच फॅक्टरी प्रशासनाची स्वयंचलीत यंत्रणा सज्ज करण्यात आली.
दुसर्या बाजुने जामनेर नगरपालिकेचा अग्नीशमन बंबही तात्काळ घटनास्थळी पोहचला आणि दोघांच्या अथक प्रयत्नाने अर्ध्या-पाऊन तासातच आग आटोक्यात आली. नपाच्या अग्नीशमन दलाचे विनोद गोपाळ, राजेंद्र सोनार, गणेश बोरसे, स्वामी पाटील, स्टार्च फॅक्टरीचे अधिकारी, कर्मचारी, हमालवर्ग यांनी अचानक लागलेली आग विझविण्यासाठी मदत केली. आग कशामुळे लागली याचा अद्याप सुगावा लागलेला नाही.