वॉशिंगटन । मालदीवमध्ये चीनने आपला हस्तक्षेप वाढवल्यामुळे अमेरिकेने त्याची गंभीर दखल घेतली असून, मालदीवचे काय करायचे त्याबाबत ठरवावे लागेल, असे अमेरिकेने म्हटले आहे. मालदीवमध्ये चीनने जमीन बळकावल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. स्वतंत्र आणि खुल्या इंडिया-पॅसिफिकच्या नियमांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत,असे अमेरिकेने म्हटले आहे.
मालदीववरील चीनचा प्रभाव आणि तिथल्या घडामोडी चिंता वाढवणार्या आहेत असे पेंटॉगानचे वरिष्ठ अधिकारी जोई फेल्टर यांनी म्हटले आहे. मालदीवने नुकतेच भारताचे गिफ्ट परत केले होते. मालदीवमध्ये घडणार्या घडामोडी भारताच्या दृष्टीनेसुद्धा चिंताजनक आहेत याची आम्हाला कल्पना आहे. मालदीवचा प्रश्नाचा कसा सामना करायचा ते लवकरच ठरवू, असे पेंटागॉनने स्पष्ट केले.