माले- गेल्या काही महिन्यांपासून मालदीवमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होती. राष्ट्रपती राजवट लागू असतांना अनेक अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर मालदीवमध्ये सत्ताबदल झाले आहे. राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत वर्तमान राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांना पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार इब्राहीम मोहम्मद सोलिह यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला.
मालदीवमधील सत्ताबदल हे भारतासाठी चांगले मानले जात आहे. एका संकेतस्थळाच्या माहितीनुसार सोलिह यांना ९२ टक्के मतांपैकी ५८.३ टक्के मते मिळाली आहेत.