मालपूर,नांद्रेच्या विकासाची ग्वाही

0

साक्री ।गावांचा विकास करण्यासाठी भारत डायनामिक कंपनीच्या मदतीने त्यांच्या सी.एस.आर. निधीतून मालपूर व नांद्रे गावाचा विकास करणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मालपूर गावाच्या सत्कार समारंभात सांगितले.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विशाल देसले, राष्ट्रवादीचे प्रात सदस्य सुरेश सोनवणे, जयप्रकाश भामरे, मंगला पाटील, संजय अहिरराव, डी.एल. तोरवणे, प्रवीण भामरे, दिलीप भामरे होते. यावेळी परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

लाटीपाटाचे पाणी कायकाडा प्रकल्पात सोडणार
ना. डॉ. सुभाष भामरे पुढे म्हणाले की, एखाद्या गावासाठी विकास कामे करता येतात. त्यासाठी दोन कोटी रुपयाचा निधी कंपनीच्या निधीतून उपलब्ध करण्यात येत असतो. त्यासाठी या दोन गावांची निवड करण्यात आली आहे. सत्कार स्वीकारण्यासाठी नव्हे तर मी माझ्या गावासाठी काही तरी करावे म्हणून आज मालपूर गावात आलोे आहे. गावकर्‍यांनी माझा सत्कार केला तो हृदयात कोरला जाणारा सत्कार आहे.

गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या आशिर्वादाने अनेक प्रश्‍न सोडविण्याची ताकद मला मिळणार आहे. साखर कारखाना व कारखाना परिसरात पाटचारीच्या क्रॉकीटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. जामखेली धरणाच्या पाटचारीचे काम भांडणे गावापर्यंत करण्यात येणार आहे. लाटीपाटा धरणाचे पाणी कायकाडा धरणात सोडण्यासाठी पाटचारीचे काम करण्याची मागणी यावेळी करण्यात आली ती पूर्ण करण्याचे आश्‍वासन यावेळी ना. भामरे यांनी दिले.

पांझराकान कारखाना सुरु करणार
कन्नड घाटात 12 कि.मी लांबीच्या बोगद्याचे काम होणार, इंदौर-मनमाड रेल्वेमार्गासाठी 10 हजार कोटी निधी मिळवला. साक्री पिंपळनेर क्रॉक्रीटीकरण पाटचारीसाठी 40 लाख निधी मिळवून देणार, असेही ना. भामरे यांनी सांगितले. तसेच पांझराकान सहकारी साखर कारखाना चालू करणार असून त्या ठिकाणीच चालवण्याच्या अटीवर तो चालवण्यास देणार असल्याचे ते म्हणालेे. तसेच साक्री तालुक्यातील सिंचनाचा प्रश्‍न सोडविण्याची ग्वाही केंद्रीय संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी यावेळी दिली.