मालमत्तांच्या नुतणीकरणास एक वर्षाची मुदतवाढ

0
62 कॅन्टोेंन्मेंट बोर्डातील मालमत्ताधारकांना दिलासा
खडकी : देशातील 62 कॅन्टोेंन्मेंट बोर्ड हद्दीतील मालमत्तांच्या करार नुतणीकरणास एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. दिल्ली रक्षा संपदा विभाग कार्यालयामार्फत खडकी बोर्डास या बाबतचे पत्र पाठविले आहे. यामुळे मालमत्ताधारकांना मोठा दिलास मिळाला आहे.           कॅन्टोन्मेंट हद्दीतील जागा करार रुपाने मालमत्ताधारक यांना नियम व अटी नुसार दिल्या जातात. त्याची मुदत सुरुवातीस 30 वर्षाची असते. त्यानंतर दर 30 वर्षांनी ते करार तीनवेळा म्हणजे 90 वर्षापर्यंत वाढविण्यात येतो. देशातील 62 बोर्ड हद्दीतील करार नुतणीकरणाबाबत माहीती मागवली होती. त्या अनुषंगाणे ज्या करारांची मुदत संपली आहे किंवा ज्यांचे नुतणीकरण नियमित वेळेत केले गेले नाही अशा सर्व करार रुपी मालमत्ता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. सर्व बोर्ड प्रशासनाने नुतणीकरणासाठी प्रक्रीया राबवली गेली. बोर्ड प्रशासनाने 15 नोव्हेंबर 2018 पर्यत कराररुपी मालमत्तांचे नुतणीकरण करण्याची मुदत देण्यात आली होती.
खडकीमध्ये 55 करारांचे नुतनीकरण नाही
खडकी कॅन्टोंन्मेंट हद्दीतील 256 पैकी साधारणपणे 55 करार रुपी मालमत्तांचे मुदतीत नुतणीकरण झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने या 55 मालमत्ता रद्द करण्याचा प्रस्ताव सभेत घेऊन तो पुढील प्रक्रीयेसाठी सदन कमांड पुणे येथे पाठविण्यात आला. मालमत्ताधारकांची त्यामुळे मोठी अडचण झाली. बोर्ड प्रशासनाने तसेच उपाध्यक्ष कमलेश चासकर यांनी सर्व करार धारकांना नुतणीकरणासाठी मुदतवाढ मिळावी असे पत्र दिल्ली रक्षा संपदा विभागास पाठविण्यात आले. त्याला रक्षा संपदा विभागाच्यावतीने मालमत्ता नुतणीकरणास 31 डिसेंबर 2019 पर्यंत अर्थात एक वर्ष मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढी मुळे निराश झालेल्या मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.