पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील कचराप्रकरणी हेतुपुरस्कररित्या गैरसमज पसरविले जात आहेत. महापालिका सक्षम नाही, याची जाणीव आहे. परंतु ती जबाबदारी त्यांना कधी ना कधी उचलावी लागेल. सिडकोने हे काम ठेकेदार द्धतीने राबविले आहे. महापालिकेने निविदा काढून ठेकेदाराची नियुक्ती करावी. डम्पिंग ग्राऊंड सिडकोने दिलेले आहे. त्याची क्षमता पुढील दहा वर्षाची आहे, असे मत सिडकोचे व्यवस्थापक संचालक भूषण गगरानी यांनी व्यक्त केले.
सिडको नैना प्रकल्प राबविणार आहे. त्याची अजुन दिशा ठरलेली नाही. संपादित करणार्या जमिनीचा मोबदला शेतकर्यांना देण्यासंदर्भात साडेबारा, साडे बाविस टक्के भुखंड देण्याचा अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, एकूण जमीनीपैंकी 60 टक्के जमिन शेतकर्यांकडे राहिल, 25 टक्के जमिन रस्ते, गटारे, बगिचा व इतर विकासासाठी वापरली जाईल. उर्वरित 15 टक्के जमिन सिडको विकणार आहे. या प्रक्रियेला अद्याप उशिर असल्याने त्यांच्या मुलभूत समस्या सोडविण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदेने घ्यावी, असे आवाहनही गगरानी यांनी पनवेल संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाशी बोलताना केले.