आयर्लंड : आयर्लंडच्या पंतप्रधानपदी मूळचे मालवणचे असलेले लिओ वराडकर यांची निवड करण्यात आली आहे. आयर्लंडच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत वराडकर यांनी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला आहे. लिओ यांनी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला. लिओ यांना 73 पैकी 51 मते मिळाली. भारतात मराठी माणसाला पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली असली, तरी आयर्लंडच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान झाला आहे. वराडकर यांच्या विजयानंतर मूळ मालवणमध्ये त्यांच्या गावी जल्लोष करण्यात आला.
1960 मध्ये लिओ यांचे वडील अशोक वराडकर भारतातून इंग्लंडला गेले. ते तिथेच स्थायिक झाले. लिओ वराडकर यांचे कुटुंब मूळचे सिंधुदुर्गमधल्या वराड गावचे. लिओ कधी आपल्या गावी आले नसले, तरी त्याचे आईवडील मात्र अधूनमधून येतच असतात. पण तरीही लिओविषयी या गावकर्यांना खूपच आपुलकी आहे. लिओच्या विजयाचे वृत्त येताच त्यांच्या मूळगावी जल्लोष करण्यात आला.
वयाच्या 22व्या वर्षी लिओ यांनी राजकारणात पदार्पण केले होते. 27 व्या वर्षी ते संसदेत निवडून आले. त्यानंतर 2011 ते 2013 या कालावधीत त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रिपद भूषवले. 2014 ते 2016 या काळात ते आयर्लंडचे आरोग्य मंत्री होते. आयर्लंडमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लिओ हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. लिओ यांनी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला. लिओ यांना 73 पैकी 51 मते मिळाली.