चिंचवड-येथील चाफेकर चौकातील उड्डाणपुलावरून जात असलेल्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनाला भर रस्त्यात अचानक आग लागली. एका खाजगी कंपनीसाठी वाहतूक करणारी ही मालवाहू वाहन होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे संशय व्यक्त केले जात आहे. चिंचवडहून डांगेचौककडे जात असतांना ही घटना घडली. दरम्यान आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही मात्र वित्त हानी झाली आहे.
वाहनांची वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडल्याने बघ्याची मोठी गर्दी याठिकाणी जमा झाली होती. त्यामुळे काहीवेळ वाहतूक खोळंबली होती.