जळगाव । पाळधी येथून फर्दापूरकडे जात असलेल्या मालवाहू वाहनाला समोरुन भरधाव येणार्या ट्रव्हल्सची जोरदार धडक दिल्याची घटना 13 मे रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात मालवाहू गाडीतील चालकासह दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी टॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पाळधी येथील समाधान भगवान पाटील (वय-47) हे प्रदिप पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह खाजगी कामानिमीत्त मालवाहू गाडी (क्र एमएच 06 बीएम 6844) ने फर्दापूर येथे दि. 13 रोजी गेले होते. कामकाज आटोपून रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पाळधी येथे परतत असतांना जळगावहून औरंगाबादकडे जाणार्या (क्र-एमएच 19 सीवाय 8222) या क्रमांकाच्या लक्झरी बसने समोरुन येणार्रा मालवाहून गाडीला जोरदार धडक दिली.
पहूर पोलिसात गुन्हा दाखल
या अपघातात मालवाहू गाडीतील चालक प्रदिप पाटील यासह ज्ञानेश्वर पाटील हे गंभीर जखमी झाले. दरम्यान 108 क्रमाकांच्या रुग्णवाहिकेने त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. यात ज्ञानेश्वर पाटील यांचा पाय फॅक्चर झाले असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. याप्रकरणी ट्रॅव्हल्सचालक दशरथ वामन तळेले रा. भुसावळ यांच्याविरुद्ध समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरुन पहुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.