नाशिक : नाशिककडून निफाडला जाणारा मालवाहू ट्रक कादवा नदीच्या पुलावरुन जात असतांना पुलाचे लोखंडी कठडे तोडून नदीपात्रात कोसळला. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला असून या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे.
नाशिककडून मालवाहू ट्रक रात्री निफाडला निघाला होता. या ट्रकमध्ये भंगाराचे सामान भरलेले होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा ट्रक कादवा येथे नदीच्या पुलावर पोहोचला. त्यादरम्यान हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे कादवा नदीवरील २० ते २२ लोखंडी सुरक्षा कठडे पूर्णत: तुटले आहेत. या अपघातामुळे या पुलावरुन वाहतूक करणं धोकादायक असल्याचं समोर आले आहे.