मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव : औरंगाबाद महामार्गावरील विमानतळाजवळ भरधाव मालवाहू पिकअप व्हॅनने पुढे चालणार्‍या दुचाकीला धडक दिलयाने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. बुधवार, 16 फेब्रुवारी रोजी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात मालवाहू वाहनावरील अज्ञात चालकावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भरधाव पिकअपची दुचाकीला धडक
अविनाश रमेश चौधरी (32, रा.चिलगाव, ता.जामनेर) हे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दुचाकीने जळगाव-औरंगाबाद महामार्गावरून विमानतळाजवळून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणारी (एम.एच.46 ए.एफ. 3871) मालवाहू पिकअप व्हॅनने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात धडकेत दुचाकीस्वार अविनाश चौधरी हे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी अविनाश चौधरी यांच्या जबाबावरून बुधवार, 16 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात मालवाहू पिकअप व्हॅनवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार गफुर तडवी करीत आहे.