जळगाव : मालवाहू वाहनाच्या धडकेत दोन तरुण जखमी झाल्याची घटना 12 मार्च रोजी तालुक्यातील नशिराबाद टोलनाक्याजवळ घडली होती. या घटनेप्रकरणी वाहनचालकांविरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
वाहन चालकाविरोधात गुन्हा
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील यश अरुण लोखंडे हा त्याचा मित्र राकेश जाधवसोबत शनिवार, 12 मार्च रोजी नशिराबाद टोलनाका परीसरात गेला असता मालवाहू वाहन (एम.एच.19 डी.के.7073) या मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने यश व राकेश या दोघांना दुखापत झाली होती. उपचार घेतल्यानंतर याप्रकरणी यश याने दिलेल्या तक्रारीवरुन सोमवारी सोमवार, 21 मार्च रोजी मालवाहू वाहन (एम.एच. 19 डी.के. 7073) वाहनावरील अनोळखी चालकांविरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहेत.