मुंबई – मालाड येथे कारची धडक लागून झालेल्या अपघातात रिक्षाचालक आरिफ डोकडीया जखमी झाला. अपघातानंतर कारचालक पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी अपघाताप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. विजय बाबूराव पडुळ हे काल सकाळी रिक्षाने जात होते. ही रिक्षा मालाड येथील दत्त मंदिर रोडवरील क्लासिक हॉटेलसमोरुन जात असताना एका भरवेगात जाणार्या कारने रिक्षाला जोरात धडक दिली.
या अपघातात रिक्षाचालक अरिफ हा गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघातानंतर भयभीत झालेल्या कारचालकाने त्याला कुठलीही वैद्यकीय मदत न करता तेथून पलायन केले. या घटनेनंतर रिक्षात प्रवास करणार्या विजय पडुळ यांनी दिडोंशी पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरिफ लातातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पळून गेलेल्या कारचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.