मालिका खिशात…

0

विशाखापट्टणम । टीम इंडियाने विशाखापट्टणममध्ये श्रीलंकेचा 8 गडी राखून पराभव करत एकदिवसीय मालिकेवर आपले नाव कोरले आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेकडून भारताला हार पत्करावी लागली होती.

परंतु, दुसर्‍या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या द्विशतकाच्या बळावर टीम इंडियाने मालिकेत जोरदार पुनरागमन केले. पाहुण्या संघाने प्रथम फलंदाजी करत 215 धावा केल्या. भारताने केवळ 2 गडी गमावत आपले लक्ष्य गाठले.