मालिका गमावली म्हणजे आम्ही हरलो असं नाही – विराट कोहली

0

नवी दिल्ली:इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा ६० धावांनी पराभव झाला. इंग्लंडने भारतापुढे चौथ्या डावात विजयासाठी २४५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण भारतीय फलंदाजांना हे लक्ष्य गाठता आले नाही. या विजयाबरोबर इंग्लंडने कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्याच्या चौथ्या डावात कर्णधार कोहलीने सर्वाधिक ५८ आणि उपकर्णधार रहाणेनी ५१ धावा केल्या. पण त्यांना भारताला सामना जिंकवून देता आला नाही. पण मालिका गमावली असली, तरी आम्ही हत्यारं टाकून दिलेली नाहीत, अशी प्रतिक्रिया भारतीय कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर दिली.

भारत जरी मालिकेत पराभूत झालेला असला, तरी आमचा संघ खचलेला नाही. आणखी एक सामना शिल्लक आहे आणि मालिका गमावली म्हणून आम्ही आमची हत्यारे किंवा लढण्याची जिद्द सोडणार नाही. शेवटचा सामना ओव्हल मैदानावर होणार असून त्यात आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू, असे कोहली म्हणाला.