किंग्जस्टन । रविवारी झालेल्या वेस्टइंडिजविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यातील लाजीरवाण्या पराभवामुळे भारतीय संघ टिकेचा धनी झाला होता. गुरुवारी होणार्या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यातील विजयासह मालिका खिशात घालण्याच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरेल. चौथ्या सामन्यात वेस्टइंडिजने दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारतीय संघ सहज करेल असे वाटत होते. पण मैदानात मात्र फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे भारताला 11 धावांनी लाजीरवाणा पराभव पत्कारायला लागला. या सामन्यातील धोनीची संथ फलंदाजी चर्चेचा विषय ठरला होता. धोनीने त्या सामन्यात 114 चेंडूत 54 धावा केल्या, पण त्यामुळे 70 चेंडू निर्धाव राहिल्यामुळे फुकट गेले होते. त्यामुळे धोनीच्या मॅच फिनीशर या बिरुदावलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. रविंद्र जडेजाही खराब फटका खेळून बाद झाल्यामुळे भारताच्या तळाच्या फलंदाजांचे अपयश पुन्हा ऊठून दिसले होते. सलामीला येणार्या शिखर धवन आणि अजिंक्य रहाणेने सातत्यपूर्ण फलंदाजी केली असल्यामुळे त्यांच्याकडून संघाला आशा आहे. रहाणेने मालिकेत तीन अर्धशतके आणि एक शतक ठोकले आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 असा आघाडीवर आहे. पण सुमार खेळामुळे सामना गमावल्यास मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठलीही चूक न करता सामन्यासह मालिका जिंकण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल.
विंडीजचा बरोबरी साधण्याचा प्रयत्न
चौथ्या सामन्यात विजय मिळवल्यामुळे विडींजचा संघ मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधण्यास उत्सुक असणार यात वाद नसणारच. यजमान संघातील सलामीचा फलंदाज एविन लुईस आणि कायल होप संघाला चांगली सुरवात करन देण्यात यशस्वी ठरले. या सामन्या यश मिळवण्यासाठी भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागला होता. डावातील 20 व्या षटकापर्यंत विंडीजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना विकेट मिळू दिली नव्हती. कर्णधार जेसन होल्डरच्या प्रेरणेने विंडीजचे गोलंदाजी आणखी एकदा विजयासह मालिका बरोबरीत राखण्यासाठी प्रयत्न करणार या शंका नाही.
संघात बदल होण्याची शक्यता
चौथ्या सामन्यातील फलंदाजांच्या कामगिरीबाबत विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे भारताच्या मधल्या फळतील फलंदाजांच्या क्रमात बदल झालेला दिसला तर आश्चर्य वाटणार नाही. तीनवर्षाहून अधिक काळ भारताचे प्रतिनिधीत्व करणार्या दिनेश कार्तिकला चौथ्या सामन्यात छाप पाडता आली नव्हती.एका सामन्यातील अपयशामुळे त्याल संघाबाहेर करण्याचानिर्णय संघव्यवस्थापन घेणार नाही.
युवराज सिंगच्या स्नायूंच्या पेशी दुखावल्या आहेत. त्यामुळे त्याच्या सहभागाबद्दल अनिश्चितता आहे. केदार जाधवलाही अनेक संधी मिळाल्या आहेत. पण त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. मालिकेत आघाडीवर असूनही या सामन्यात भारतीय सघात अनेक बदल घडण्याची शक्यता आहे.
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन,अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार,उमेश यादव, कुलदीप यादव, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा.
वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), सुनील अंबरिश, देवेंद्र बिशू,रॉस्टन चेज, मिग्युअल कमिन्स, कायल होप, शाई होप, अल्झारी जोसेफ, एविन लुईस, जेसन मोहम्मद, अॅशले नर्स,रॉवमन पॉवेल, केसरिक विल्यम्स.
भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्या. 7.30 वाजल्यापासून